Fssai कलम १०० : अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याचे संशोधन :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १०० :
अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याचे संशोधन :
अधिसूचित केलेल्या दिवसापासून, अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याच्या तरतुदी (येथे यापुढे मुख्य अधिनियम म्हणून संबोधले जाईल) निम्नलिखित सुधारणांना अधीन राहून लागू होतील, अर्थात :-
(a) क) मुख्य अधिनियमात अन्न भेसळ प्रतिबंधक अधिनियम १९५४ (१९५४ चा ३७) च्या उल्लेखाऐवजी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ अशी सुधारणा होईल.
(b) ख) मुख्य अधिनियमात कलम १२ मध्ये अन्न भेसळ प्रतिबंधक अधिनियम १९५४ (१९५४ चा ३७) यातील कलम ९ नुसार नियुक्त केलेले कोणतेही अन्ननिरीक्षक याऐवजी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार नियुक्त केलेले कोणतेही अन्नसुरक्षा अधिकारी अशी सुधारणा होईल.
(c) ग) मुख्य अधिनियमात अन्ननिरिक्षक चा उल्लेख अन्नसुरक्षा अधिकारी अशी सुधारणा होईल; आणि
(d) घ) मुख्य अधिनियमातील कलम २१ चा पोटकलम (१) चा खंड (a)(क) ऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा केली जाईल, अर्थात :-
((a)क) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ या कलम ४२ च्या पोटकलम (५) अन्वये निर्देशित अधिकारी किंवा अन्न सुरक्षा अधिकारी; किंवा.)

Leave a Reply