स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
कलम ४ :
स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या हेतूने स्फोटके तयार करणे किंवा बाळगणे यासाठी शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती, बेकायदेशीरपणे किंवा दुर्भावतेने –
(a)(क)(अ) स्फोटक पदार्थाने किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल किंवा मालमत्तेला गंभीर इजा पोहोचू शकेल अशा प्रकारचा, स्फोट घडवून आणण्याच्या हेतूने किंवा स्फोटक पदार्थाने किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थाने असा स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याच्या हेतूने कोणतीही कृती करील; किंवा
(b)(ख)(ब) जीवितास धोका निर्माण करण्याच्या किंवा मालमत्तेला इजा पोहोचवण्याच्या हेतूने, स्फोटक पदार्थ किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ तयार करील किंवा स्वत:जवळ बाळगील किंवा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवील, किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस, त्या योगाने जीवन संकटात घालण्यास किंवा भारतातील मालमत्तेस गंभीर इजा पोहोचवण्यास सक्षम करील,
त्यास, असा एखादा स्फोट झाला अगर न झाला तरीही आणि एखाद्या व्यक्तीस किंवा मालमत्तेस प्रत्यक्षात इजा झाली अगर न झाली तरी,
(एक) कोणत्याही स्फोटक पदार्थाच्या बाबतीत, जन्मठेप किंवा कोणत्याही स्वरूपाच्या कारावासाची दहा वर्षांपर्यंत कितीही असू शकेल अशी शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
(दोन) विशेष प्रवर्गातील स्फोटकांच्या बाबतीत, आजीव सश्रम कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत कितीही असू शकेल अशा कालावधीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. २००१ चा अधिनियम ५४ याच्या कलम २ अन्वये कलमे २ ते ५ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.