स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
कलम २ :
१.(व्याख्या :
या अधिनियमातील,-
(a)(क)(अ) स्फोटक पदार्थ या शब्दप्रयोगात, स्फोटक पदार्थ बनवण्यास लागणारे कोणतेही साहित्य, तसेच कोणत्याही स्फोटक पदार्थांद्वारे किंवा त्याच्या मदतीने स्फोट घडवण्याच्या हेतूने वापरलेले किंवा ते वापरण्याचा हेतू असलेले किंवा ते घडवून आणण्यासाठी किंवा घडवून आणण्यात साहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेले कोणतेही उपकरण, यंत्र, अवजार किंवा साहित्य तसेच अशा कोणत्याही उपकरणाचा, यंत्राचा किंवा अवजाराचा कोणताही भाग, याचा समावेश असल्याचे मानण्यात येईल;
(b)(ख)(ब) विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ या शब्दप्रयोगात, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, केंद्र सरकारने, अधिसूचनेद्वारे, राजपत्रात विनिर्दिष्ट केलेले, रिसर्च डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव (आरडीएक्स), पेन्ट्रा एरीथ्रीटॉल टेट्रा नायट्रेट (पीईटीएन), हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव (एच एम एक्स), टड्ढाय नायटड्ढो टोल्युएन (टीएनटी), लो टेंपरेचर प्लॅस्टिक एक्सप्लोजिव (एल टी पी ई), कंपोझिशन एक्सप्लोडिंग (सीई), (२, ४, ६ फिनेल मिथेल नायट्रामीन किंवा टेट्रील), ओसीटीओएल (हाय मेल्टिंग एक्सप्लोजिव आणि ट्राय नायट्रो टोल्यूएन यांचे मिश्रण), प्लॅस्टिक एक्सप्लोजिव खडकी – १ (पीईके-१) आणि आरडीएक्स/टीएनटी संयुगे आणि त्याच प्रकारची इतर स्फोटके आणि त्याचा संयोग (आपसमेळ) आणि स्फोटकास कारणीभूत ठरणारी रिमोट कंट्रोल साधने आणि या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे राजपत्रात विनिर्दिष्ट केलेले कोणतेही इतर पदार्थ आणि त्याचे संयोग (आपसमेळ), यांचा समावेश होत असल्याचे मानण्यात येईल.)
——–
१. २००१ चा अधिनियम ५४ याच्या कलम २ अन्वये कलमे २ ते ५ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.