स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
१.(१९०८ चा अधिनियम क्रमांक ६) (८ जून १९०८)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रयुक्ती :
स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणे करणे आवश्यक आहे; याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-
———–
(१) या अधिनियमास, स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ असे म्हणावे.
२.((२) याची व्याप्ती संपूर्ण भारतभर असेल ३.(***) आणि हा ४.(भारताबाहेरील) भारताच्या नागरिकांनासुद्धा लागू आहे.)
———
१. या अधिनियमाचा विस्तार गोवा, दमण आणि दीव येथे १९६२ चा विनियम १२, याच्या कलम ३ व अनुसूची यांद्वारे, फेरबदलांसह करण्यात आला, आणि पाँडिचेरी येथे १९६३ चा विनियम ७ याचे कलम ३ व अनुसूची एक अन्वये अंमलात आला आहे. (१ ऑक्टोबर १९६३ पासून); आणि दादरा व नगर हवेली येते, १९६३ चा विनियम ६, याचे कलम २ व अनुसूची एक यांद्वारे (१ जुलै १९६५ पासून); लक्षद्वीपचे संपूर्ण संघ राज्यक्षेत्र येथे १९६५ चा विनियम ८, कलम २ व अनुसूची यांद्वारे (१ ऑक्टोबर १९६७ पासून); सिक्कीम राज्यात अधिसूचना क्र. जी.एस.आर. २०१, दिनांक ३० जानेवारी १९७६ (१ फेबु्रवारी १९७६ पासून); अंमलात आला आहे.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ पोटकलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५१ चा अधिनियम ३, कलम ३ व अनुसूची यांद्वारे भाग ख मधील राज्या व्यतिरिक्त हे शब्द निरसित करण्यात आले.
४. सन १९५१ चा अधिनियम ३, कलम ३ व अनुसूची यांद्वारे जेथे जेथे ते असतील या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.