पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम ५ :
निदेश देण्याची शक्ती :
कोणत्याही इतर कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, परंतु या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, केंद्र सरकारला, या अधिनियमाखालील आपल्या शक्तींचा वापर करताना आणि आपली कामे पार पाडताना, कोणत्याही व्यक्तीला, अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्याला लेकी निदेश देता येतील आणि अशी व्यक्ती, अधिकारी किंवा प्राधिकारी अशा निदेशांचे अनुपालन करण्यास बांधलेली राहील.
स्पष्टीकरण :
संशय निवारणासाठी, याद्वारे घोषित करण्यात येते की, या अधिनियमान्वये निदेश देण्याच्या शक्तीमध्ये पुढील निदेश देण्याच्या शक्तीचा समावेश आहे :
(a) (क) कोणताही उद्योग, कार्यचालन, किंवा प्रक्रिया बंद करणे, त्यास मनाई करणे किंवा त्याचे नियमन करणे; किंवा
(b) (ख) विजेचा किंवा पाण्याचा पुरवठा किंवा कोणतीही इतर सेवा रोखून ठेवणे किंवा तिचे नियमन करणे.
