पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम १३ :
शासकीय विश्लेषक :
केंद्र सरकार कलम १२ च्या पोटकलम (१) अन्वये स्थापन केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या कोणत्याही पर्यावरण प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेल्या हवेच्या, पाण्याच्या, मातीच्या किंवा इतर पदार्थांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयोजनार्थ, त्यास योग्य वाटतील अशा विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींना राजपत्रातील अधिसूचनेद्वारे शासकीय विश्लेषक म्हणून नियुक्त करू शकेल किंवा मान्यता देऊ शकेल.