हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ८क(अ) :
१.(विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार :
कलम ३ अन्वये कोणताही हुंडा घेण्याबद्दल किंवा घेण्याला प्रोत्साहन देण्याबद्दल किंवा कलम ४ अन्वये हुंड्याची मागणी करण्याबद्दल जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर खटला असेल त्याबाबतीत तिने या कलमान्वये अपराध केलेला नाही हे सिद्ध करण्याचा भार त्या व्यक्तीवर राहील.)
——–
१. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ८ द्वारे कलम ८क व ८ख (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.