हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम २ :
हुंडा याची व्याख्या :
या अधिनियमात हुंडा याचा अर्थ,-
(a)क)(अ) विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास, किंवा
(b)ख)(ब) विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मातापित्यांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस, १.(उक्त पक्षांच्या विवाहाच्या संबंधात) विवाहाच्या वेळी किंवा पूर्वी २.( किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी ) प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही संपत्ती किंवा मूल्ववान रोखा असा आहे, पण ज्यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा ( शरीअत) लागू आहे त्या व्यक्तिंच्या बाबतीत, त्यात देन किंवा महरचा समावेश नाही.
(c)३.(***)
स्पष्टीकरण दोन :
मूल्यवान रोखा या शब्दप्रयोगाला भारतीय दंड संहिते च्या कलम ३० मध्ये जो अर्थ दिलेला आहे, तोच आहे.
——–
१. १९८४ चा अधिनियम क्रमाकं ६३ याच्या कलम २ (क) द्वारे उक्त पक्षांच्या विवाहाचे प्रतिफल म्हणून या मजकुराऐवजी (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २ द्वारे किंवा विवाहानंतर या मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९८४ चा अधिनियम क्रमाकं ६३ याच्या कलम २ (ख) द्वारे स्पष्टीकरण (२-१०-१९८५ पासून) वगळण्यात आले.