हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम १० :
१.(नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती :
१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करु शकेल.
२) विशेषत: आणि पुर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमात पुढील सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता येतील, त्या बाबी अशा :-
(a)क)(अ) हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याने कलम ८ ख च्या पोटकलम (२) खाली पार पाडावयाची अतिरिक्त कामे;
(b)ख)(ब) हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याने कलम ८ ख च्या पोटकलम (३) अन्वये ज्या मर्यादांच्या आणि शर्तींच्या अधीनतेने कामे पार पाडावयाची त्या मर्यादा व त्या शर्ती ;
३) राज्य शासनाने या कलमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर राज्य विधानमंडळापुढे ठेवण्यात येईल.)
——–
१. १९८६ चा अधिनियम ४३ याच्या कलम ९ द्वारे मूळ कलम १० ऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.