बाल कामगार अधिनियम १९८६
भाग ३ :
१.(किशोरांच्या) कामाच्या अधिकारांचे विनियमन :
कलम ६ :
या भागाची प्रयुक्ती (लागू होणे) :
या भागाच्या तरतुदी ह्या, २.(कलम ३क) मध्ये निर्देशिलेले कोणतेही व्यवसाय किंवा प्रक्रिया ज्या आस्थापनांमध्ये चालू नसतील अशा आस्थापनांना किंवा आस्थापनांच्या वर्गाला लागू होतील.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ९ द्वारा बालकांच्या ऐवजी समाविष्ट केले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १० द्वारा कलम ३ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.