Child labour act कलम ५ : १.(तंत्र सल्लागार समिती) :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ५ :
१.(तंत्र सल्लागार समिती) :
१) केन्द्र सरकार, अनुसूचीमध्ये व्यवसाय आणि प्रक्रिया जादा दाखल करण्याच्या प्रयोजनार्थ, केन्द्र सरकारला सल्ला देण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, १.(तंत्र सल्लागार समिती) (यापुढे या कलमात जिचा निर्देश समिती म्हणून करण्यात आला आहे) या नावाची एक सल्लागार समिती घटित करु शकेल.
२) या समितीमध्ये एक अध्यक्ष व केन्द्र सरकारकडून नियुक्त करण्यात येतील असे, दहापेक्षा अधिक नसतील इतके अन्य सदस्य असतील.
३) समिती, तिला आवश्यक वाटेल तेव्हा, समितीची बैठक बोलावील आणि तिच्या कार्यपद्धतीचे विनियमन करण्याचा तिला अधिकार असेल.
४) समिती, तिला तसे करणे आवश्यक वाटले तर, एक किंवा त्याहून अधिक उपसमित्या घटित करु शकेल आणि तशा कोणत्याही उपसमितीवर जो कोणी समितीचा सदस्य नसेल अशा कोणत्याही व्यक्तीची सर्वसाधारण कारणासाठी असो किंवा कोणत्याही विशिष्ट बाबीचा विचार करण्याकरिता असो नियुक्ती करु शकेल.
५) समितीचा पदावधी, तिच्या कार्यालायातील नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची रीत आणि समितीचा अध्यक्ष व अन्य सदस्यांना देय असणारे भत्ते काही असल्यास, व समिती जी कोणी त्या समितीचा सदस्य नसेल, अशा व्यक्तीला तिच्या उपसमितीचा सदस्य म्हणून ज्या शर्ती व निर्बंधाच्या अधीनतेने नियुक्त करु शकेल त्या शर्ती व निर्बंध, हे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ८ द्वारा बाल कामगार तंत्र सल्लागार समिती याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply