Child labour act कलम ३ : १.(कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) :

बाल कामगार अधिनियम १९८६
भाग २ :
विविक्षित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) :
कलम ३ :
१.(कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध (मनाई) :
१) कोणत्याही बालकाला कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवता येणार नाही किंवा काम करु दिले जाणार नाही.
२) पोटकल (१) मधील कोणतीही गोष्ट तिथे लागू होणार नाही, जेथे बालक,-
(a)क)(अ) शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्टीच्या वेळी, अनुसूची मध्ये दिलेल्या धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रियां व्यतिरिक्त इतर उद्दोगांमध्ये त्याच्या कटुंबाला किंवा कटुंबांना मदत करतो;
(b)ख)(ब) कोणत्याही दृकश्राव्य मनोरंजन उद्योगातील, ज्याच्या अंतर्गत जाहिराती, चित्रपट, दूरचित्रवारी मालिका किंवा सर्कस व्यतिरिक्त इतर कोणतेही मनोरंजन किंवा क्रिडा क्रियाकलाप पर आहेत, विहित कलेल्या अशा अटी आणि संरक्षणाच्या उपायांना अधीन राहून, कलाकार म्हणून काम करत आहे :
परन्तु, या खंडा अन्वये अशा कोणत्याही कामाचा बालकाच्या शालेय शिक्षणावर परिणाम होणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाकरिता, –
(a)क)(अ) कोणत्याही बालकाच्या संबंधात, कुटुंब याचा अर्थ, त्याचे आई-वडील, भाऊ, बहीण आणि वडिलांची बहीण आणि भाऊ आणि आईचा भाऊ आणि बहीण, असा आहे;
(b)ख)(ब) कौटुंबिक उपक्रम याचा अर्थ, कुटुंबातील सदस्यांनी इतर व्यक्तींच्या सहकार्याने केलेले कोणतेही काम, पेशा, उत्पादन किंवा व्यवसाय, असा आहे;
(c)ग) (क)कलाकार या शब्दाचा अर्थ, जो स्वत:ला अभिनेता, गायक, क्रीडापट्टू म्हणून, पोटकलम (२) च्या खंड (ख) मध्ये येणाऱ्या मनोरंजन किंवा क्रीडा संबंधी क्रियाकलपांशी संबंधित अशा इतर क्रियाकलपांमध्ये जे विहित केले जातील, प्रत्यक्षत: किंवा छंद म्हणून थेट सामील होतो किंवा अभ्यास करतो, असा आहे.)
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ५ द्वारा कलम ३ ऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply