बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ३क :
१.(काही धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये किशोरास प्रतिबंध :
कोणत्याही किशोरास, अनुसूची मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही धोकादायक व्यवसायात किंवा प्रक्रियेत काम करण्यासाठी नियोजित किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही :
परंतु, केन्द्र सरकार, अधिसूचनेद्वारे, गैर-धोकादायक कामाचे स्वरुप निर्दिष्ट करु शकेल, ज्यामध्ये कोणत्याही किशोरास या अधिनियमानुसार काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ६ द्वारा समाविष्ट केले.