बाल कामगार अधिनियम १९८६
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,-
१.(एक क) समुचित शासन याचा अर्थ, केन्द्र सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतीही आस्थापना किंवा रेल्वे प्रशासन किंवा मोठे बंदर किंवा खाण किंवा तेलक्षेत्र यांच्याबाबतीत केन्द्र सरकार आणि इतर सर्व प्रकरणी राज्य शासन, असा आहे;
२.(एक) किशोर याचा अर्थ, ज्याने वयाची चौदा वर्ष पूर्ण केली आहेत परंतु वयाची अठरावे वर्ष पूर्ण केलेले नाही, असा आहे;)
३.(दोन) बालक याचा अर्थ, ज्या व्यक्तीने वयाचे चौदावे वर्ष पूर्ण केलेले नाही किंवा बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये नमूद केलेले वय यापैकी जे जास्त असेल ते, असा आहे.)
तीन) दिवस याचा अर्थ, मध्यरात्रीला सुरु होणार चोवीस तासांचा कालावधी, असा आहे.
चार) आस्थापना यात दुकान, वाणिज्यिक आस्थापना, कार्यशाळा, शेत, निवासी हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह, नाट्यगृह, किंवा सार्वजनिक मनोरंजनाची किंवा करमणुकीची अन्य ठिकाणे, यांचा समावेश आहे;
पाच) कुटुंब याचा अधिनियंत्रकाच्या संबंधातील अर्थ, एखादी व्यक्ती, अशा व्यक्तीची, यथास्थिति, पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले, अशा व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण, असा आहे;
सहा) अधिनियंत्रक याचा आस्थापना किंवा कार्यशाळा यांच्या संबंधातील अर्थ, आस्थापनेच्या किंवा कार्यशाळेच्या कारभारावर जिचे अंतिम नियंत्रण आहे अशी व्यक्ती, असा आहे;
सात) बंदर प्राधिकरण याचा अर्थ, बंदराचे प्रशासन करणारे कोणतेही प्राधिकरण, असा आहे;
आठ) विहित याचा अर्थ, कलम १८ अन्वये करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा आहे;
नऊ) आठवडा याचा अर्थ, शनिवारच्या मध्यरात्रीपासून किंवा निरीक्षकाने विशिष्ट क्षेत्राकरिता लेखी मान्यता दिली असेल अशा अन्य मध्यरात्रीपासून सुरु होणारा सात दिवसांचा कालावधी, असा आहे;
दहा) कार्यशाळा याचा अर्थ, जेथे कोणतीही औद्योगिक प्रक्रिया चालवली जाते अशी कोणतीही जागा (तिच्या प्रसीमा धरुन) असा आहे, परंतु ज्या जागेला कारखाना अधिनियम १९४८ (१९४८ चा ६३) याच्या कलम ७६ च्या तरतुदी त्यावेळी लागू होत असतील, अशा कोणत्याही जागेचा त्यात समावेश होणार नाही.
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ४ द्वारा खंह (एक) ला खड (एक क) मध्ये पुनक्रमांकित केले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ४ द्वारा समाविष्ट केले.
३. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ४ द्वारा खंड (दोन) ऐवजी समाविष्ट केले.