बाल कामगार अधिनियम १९८६
कलम २२ :
निरसन व व्यावृत्ती :
१) बालक सेवायोजन अधिनियम १९३८ (१९३८ का २६) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही, अशा निरसित झालेल्या अधिनियमान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कृती या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल तेथवर, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींन्वये केल्याचे qकंवा करण्यात आल्याचे समजण्यात येइल.
२००१ चा अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम २ व अनुसूची १ द्वारा कलम २३ ते २६ पर्यंत निरसित.