Child labour act कलम २१ : अडचणींचे निवारण करण्याचा अधिकार :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम २१ :
अडचणींचे निवारण करण्याचा अधिकार :
१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केन्द्र सरकार शासकीय राजपत्रात प्रकाशित केलेल्या आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनाकरिता त्यास आवश्यक व इष्ट वाटत असेल असे, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेल्या कोणत्याही तरतुदी करु शकेल :
परंतु, या अधिनियमाला ज्या दिनांकास राष्ट्रपतींची अनुमती मिळेल त्या दिनांकापासून तीन वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढता येणार नांही.
२) या कलमाखाली काढण्यात आलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या सभागृहांपुढे ठेवण्यात येईल.

Leave a Reply