Child labour act कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम १९८६
(सन १९८६ चा अधिनियम क्रमांक ६१)
१.(सर्व व्यवसायांमध्ये मुलांच्या रोजगारावर बंदी घालण्यासाठी आणि धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये किशोरवयीन मुलांच्या रोजगारावर आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी प्रतिबंधित करण्यासाठी अधिनियम)
भारतीय गणराज्याच्या सदसिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
भाग १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
१) या अधिनियमास २.(बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम १९८६) असे म्हणावे.
२) त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
३) या अधिनियमाचा भाग ३ खेरीजकरुन सर्व तरतुदी ताबडतोब अंमलात येतील, आणि केन्द्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा ३.(दिनांकास) भाग ३ अंमलात येईल आणि निरनिराळ्या राज्यांसाठी व निरनिराळ्या वर्गांच्या आस्थापनांसाठी निरनिराळे दिनांक नियत करता येतील.
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २ द्वारा दिर्घ शिर्षका ऐवजी समाविष्ट केले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ३ द्वारा बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम १९८६ याऐवजी समाविष्ट केले.
३. २६ मे १९९३, अधिसूचना क्रमांक एस. ओ. ३३३ (ई), दिनांक २६ मार्च १९९३, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, कलम ३ (दोन) पहा.

Leave a Reply