Child labour act कलम १७ : निरीक्षकांची नियुक्ती :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १७ :
निरीक्षकांची नियुक्ती :
समुचित शासन, या अधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन निश्चितपणे व्हावे या प्रयोजनासाठी काही व्यक्तींना निरीक्षक म्हणून नियुक्त करु शकेल व अशा रीतीने नियुक्त केलेला कोणताही निरीक्षक भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply