Child labour act कलम १७क(अ) : १.(जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून तरतुदींची अंमलबजावणी :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १७क(अ) :
१.(जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून तरतुदींची अंमलबजावणी :
समुचित शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी होत आहे याची खात्री करण्यासाठी, जिल्हा दंडाधिकाऱ्यावर अशी कर्तव्य लादू शकेल आणि असे अधिकार देऊ शकेल, जे आवश्यक असतील आणि जिल्हा दंडाधिकारी, त्यांच्या अधीनस्थ अधिकारी, जे सर्व किंवा काही अधिकारी अशा प्रकारे प्रदान केलेले अधिकार वापरतील, आणि सर्व किंवा काही कर्तव्ये पार पाडतील आणि स्थानिक मर्यादा निर्दिष्ट करु शकतील ज्यामध्ये अशी कर्तव्य पार पाडतील किंवा असे अधिकार विहित केल्याप्रमाणे वापरतील.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २० द्वारा समाविष्ट केले.

Leave a Reply