Child labour act कलम १५ : शास्तीच्या संबंधात विवक्षित कायद्यांच्या दुरुस्त्या लागू होणे :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १५ :
शास्तीच्या संबंधात विवक्षित कायद्यांच्या दुरुस्त्या लागू होणे :
१) जर कोणतीही व्यक्ती, पोटकलम (२) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदींचे व्यतिक्रमण केल्यामुळे दोषी असल्याचे आढळेल आणि सिद्धदोषी ठरेल तर, ती, या अधिनियमाच्या कलम १४ ची पोटकलमे (१) व (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे शास्तीस पात्र असेल; परंतु ह्या तरतुदी, ज्या अधिनियमांमध्ये अंतर्भूत असतील त्या अधिनियमाखाली नव्हे.
२) पोटकलम (१) मध्ये निर्देश केलेल्या तरतुदी ह्या खाली नमूद केलेल्या तरतुदी असतील :-
(a)क)(अ) कारखाना अधिनियम १९४८ (१९४८ चा ६३) याचे कलम ६७;
(b)ख)(ब) खाण अधिनियम १९५२ (१९५२ चा ३५) याचे कलम ४०;
(c)ग)(क) वाणिज्य नौवहन अधिनियम १९५८ (१९५८ चा ४४) याचे कलम १०९; आणि
(d)घ)(ड) मोटार परिवहन कामगार अधिनियम १९६१ (१९६१ चा २७) याचे कलम २१.

Leave a Reply