Child labour act कलम १४ख : १.(बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १४ख :
१.( बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी :
१) समुचित शासन, प्रत्येक जिल्ह्यात किंवा दोन किंवा अधिक जिल्ह्यांसाठी, बालक आणि किशोर कामगार पुनर्वसन निधी नावाने एक निधी स्थापन करेल ज्यामध्ये असा जिल्हा किंवा जिल्ह्यांच्या अधिकारक्षेत्रातील बालक आणि किशोर यांच्या मालकाकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम जमा केली जाईल.
२) समुचित शासन, पोटकलम (१) अन्वये दंडाची रक्कम जमा केलेल्या प्रत्येक बालक किंवा किशोर यासाठी, निधीमध्ये पंधरा हजार रुपए जमा करील.
३) पोटकलम (१) आणि पोटकलम (२) अन्वये निधीमध्ये जमा केलेली रक्कम अशा बँकामध्ये जमा केली जाईल किंवा अशा पद्धतीने गुंतवणूक केली जाईल, जसे समुचित शासन निश्चित करेल.
४) पोटकलम (३) अन्वये, यथास्थिति, जमा केलेली किंवा गुंतवलेली रक्कम, आणि त्यावर जमा होणारी व्याजाची रक्कम, ज्या बालकाच्या किंवा किशोराच्या नावे विहित केलेल्या पद्धतीने जमा केली जाईल.
स्पष्टीकरण :
समुचित शासन याच्या प्रयोजनासाठी, केन्द्र सरकार च्या अंतर्गत राज्यघटनेच्या अनुच्छेद २३९क अधीन केन्द्रशासित प्रदेशाचा प्रशासक किंवा उपराज्यपाल यांचा समावेश ही होतो.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १९ द्वारा समाविष्ट केले.

Leave a Reply