Child labour act कलम १३ : आरोग्य व सुरक्षितता :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १३ :
आरोग्य व सुरक्षितता :
१) समुचित शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही आस्थापनेमध्ये किंवा आस्थापनांच्या वर्गामध्ये नोकरीवर ठेवलेल्या किंवा काम करण्याची परवानगी दिलेल्या १.(किशोरांचे) आरोग्य व सुरक्षितता यांसाठी नियम करु शकेल.
२) उक्त नियमांच्या पूर्ववर्ती तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न येता, खालील सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करण्यात येतील :-
(a)क)(अ) कामाच्या जागेची स्वच्छता राखरे व ती उपद्रवरहित करणे;
(b)ख)(ब) कचऱ्याची आणि निसृत पाण्याची विल्हेवाट लावणे;
(c)ग) (क) वायुवीजन (व्हेन्टीलेशन) आणि तापमान;
(d)घ) (ड) धूळ आणि धूर;
(e)ङ)(इ) कृत्रिम आद्र्रीकरण;
(f)च) (फ) प्रकाशयोजना;
(g)छ) (ग) पिण्याचे पाणी;
(h)ज) (ह) शौचकूप व मुताऱ्या;
(i)झ)(आय) थूंकदाण्या;
(j)ञ)(जे) यंत्रसामग्रीस कुंपण घालणे;
(k)ट)(के) चालू यंत्रसामग्रीवर किंवा यंत्रसामग्रीजवळ काम करणे;
(l)ठ)(एल) धोकादायक यंत्रांवर १.(किशोरांना) नोकरीवर ठेवणे;
(m)ड)(एम) धोकादायक यंत्रावर नोकरीवर ठेवलेल्या १.(किशोरांच्या) संबंधात सूचना, प्रशिक्षण देणे आणि पर्यवेक्षण करणे;
(n)ढ)(एन) वीजप्रवाह खंडीत करण्याचे साधन;
(o)ण)(ओ) स्वयंचलित यंत्रे;
(p)त)(पी) नवीन यंत्रसामग्री सुकर करणे;
(q)थ)(क्यू) तळजमीन, जिने आणि पोच मार्ग;
(r)द)(आर) खळी, खड्डे, जमिनीतील खळगे, इत्यादी;
(s)ध)(एस) अत्याधिक वजन;
(t)न)(टी) डोळ्यांचे संरक्षण;
(u)प)(यू) स्फोटक व ज्वालाग्राही धूळ, वायू, इत्यादी;
(v)फ)(व्ही) आगीच्या प्रसंगी बाळगावयाची सावधगिरी;
(w)ब)(डब्ल्यू) इमारतींची देखभाल; आणि
(x)भ)(एक्स) इमारत आणि यंत्रसामग्रीची सुरक्षितता.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १७ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply