बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ११ :
नोंदवही ठेवणे :
प्रत्येक अधिनियंत्रक, कोणत्याही आस्थापनेमध्ये कामावर ठेवलेल्या किंवा काम करण्याचची परवानगी दिलेल्या १.(किशोरासंबंधी) एक नोंदवही ठेवील आणि कामाच्या वेळात सर्वकाळ किंवा अशा कोणत्याही आस्थापनेमध्ये काम चालू असेल त्यावेळी निरीक्षकाला ती निरीक्षणासाठी उपलब्ध असेल व त्या नोंदवहीत पुढील गोष्टी दर्शविण्यात येतील :-
(a)क)(अ) अशा प्रकारे कामावर ठेवलेल्या किंवा काम करण्याची परवानगी दिलेल्या प्रत्येक १.(किशोराचे) नाव व जन्मदिनांक;
(b)ख)(ब) अशा कोणत्याही १.(किशोराच्या) कामाच्या वेळा व त्याच्या हक्काचा विश्रांतीचा मध्यंतराचा काळ;
(c)ग)(क) अशा कोणत्याही १.(किशोराच्या) कामाचे स्वरुप; आणि
(d)घ)(ड) विहित करण्यात येतील असे अन्य तपशील.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १५ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
