Child labour act कलम १० : वयासंबंधीचे विवाद :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १० :
वयासंबंधीचे विवाद :
अधिनियंत्रकाने, ज्याला आस्थापनेमध्ये कामावर ठेवले आहे किंवा काम करण्याची परवानगी दिली आहे अशा कोणत्याही १.(किशोराच्या) वयासंबंधी निरीक्षक व अधिनियंत्रक यांच्यामध्ये वाद उपस्थित झाल्यास, अशा १.(किशोराच्या) वयाबाबत विहित वैद्यकिय प्राधिकरणाने प्रमाणपत्र दिलेले नसल्यास, निरीक्षक, तो प्रश्न विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे निर्णयार्थ सोपवील.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १४ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply