Bnss कलम ४११ : मतभेदाच्या बाबतीतील प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४११ : मतभेदाच्या बाबतीतील प्रक्रिया : जेव्हा न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर अशा कोणत्याही खटल्याची सुनावणी झाली असेल आणि मताच्या बाबतीत असे न्यायाधीश समसमान विभागले गेले असतील तेव्हा, कलम ४३३ मध्ये उपबंधित केलेल्या रीतीने प्रकरणाचा निर्णय करण्यात येईल.