महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५४ :
पोलीस इमारतीबद्दल राज्यशासनाने नगरपालिका कर किंवा इतर कर न देणे :
१.(पोलीस दलातील व्यक्तींनी, त्यांची कामे सोईस्कर रीतीने करता यावी म्हणून बृहन्मुंबई २.( या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील मुंबई प्रदेशातील) व व तसेच राज्य सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जाहीर करील अशा ३.(महाराष्ट्र राज्याच्या) उरलेल्या प्रदेशातील) कोणत्याही घराचा किंवा जागेचा भोगवटा किंवा उपयोग केल्याबद्दल नगरपालिका कर किंवा इतर स्थानिक कर राज्यशासनाकडून देय असणार नाहीत.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३३ अन्वये बृहन्मुंबईखेरीज इतर कोणत्याही प्रदेशात या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये दुसऱ्या राज्यात घातलेले प्रदेश वगळून पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यातील कोणत्याही प्रदेशात या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई राज्याच्या या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
