भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ९३ :
या प्रकरणाच्या तरतुदी सर्वसाधारणपणे समन्सांना व अटक – वॉरंटांना लागू असणे :
समन्स व वॉरंट आणि ते काढणे, बजावणे व त्याची अंमलबजावणी करणे यासंबंधीचे या प्रकरणात अंतर्भूत असलेले उपबंध या संहितेखाली काढलेल्या प्रत्येक समन्सला व अटकेच्या वॉरंटाला शक्य होईल तेथवर लागू असतील.