भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ९१ :
उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र घेण्याचा अधिकार :
जिच्या उपस्थितीसाठी किंवा अटकेसाठी समन्स किंवा वॉरंट काढण्याचा कोणत्याही न्यायालयाच्या पीठीसीन अधिकाऱ्याला अधिकार प्रदान झाला असेल अशी कोणतीही व्यक्ती अशा न्यायालयात उपस्थित असेल तर, असा अधिकारी अशा व्यक्तीला अशा न्यायालयात किंवा ज्याच्याकडे ते प्रकरण संपरीक्षेसाठी वर्ग करता येईल अशा अन्य कोणत्याही न्यायालयात तिने उपस्थित राहण्यासाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्यास फर्मावू शकेल.