Bnss कलम ९० : समन्स ऐवजी अगर आणखी अतिरिक्त वॉरंट काढणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(D) घ) (ड) – कार्यवाही संबंधीचे इतर नियम :
कलम ९० :
समन्स ऐवजी अगर आणखी अतिरिक्त वॉरंट काढणे :
कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीसाठी समन्स काढण्याकरता या संहितेव्दारे न्यायालयाला अधिकार प्रदान केला असेल अशा कोणत्याही प्रकरणी,
(a) क) (अ) जर एकतर असे समन्स काढण्यापूर्वी, किंवा ते काढल्यानंतर पण त्या व्यक्तीच्या उपस्थितीसाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी, ती व्यक्ती फरारी झाली आहे किंवा ती समन्सचे पालन करणार नाही असे न्यायालयाला सकारण वाटले तर; किंवा
(b) ख) (ब) जर अशा वेळी ती उपस्थित राहण्यास चुकली व समन्साअनुसार उपस्थित होणे तिला शक्य होईल अशा प्रकारे समन्स वेळेवर रीतसर बजावले होते असे शाबीत झाले व अशा चुकण्याबद्दल कोणतीही वाजवी सबब पुढे केलेली नसेल तर, त्या व्यक्तीच्या अटकेसाठी न्यायालय आपली कारणे लेखी नमूद करून, वॉरंट काढू शकेल.

Leave a Reply