भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८९ :
जप्त मालमत्ता परत करण्यासाठी अपील नामंजूर केलेल्या आदेशाला अपील :
कलम ८८ च्या पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेली जी व्यक्ती मालमत्ता किंवा विक्रीचे उत्पन्न सुपुर्द केले जाण्यास नकार मिळाल्यामुळे नाराज झाली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला प्रथम उल्लेखिलेल्या न्यायालयाच्या शिक्षादेशांवर सर्वसामान्यपणे ज्या न्यायालयाकडे अपिले होऊ शकतात त्याच्याकडे अपील करता येईल.