भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६९ :
स्थानिक मर्यादेबाहेर (सीमे बाहेर) समन्साची बजावणी :
जेव्हा आपण काढलेले समन्स आपल्या स्थानिक अधिकारितेच्या बाहेर कोणत्याही स्थळी बजावण्यात यावे अशी न्यायालयाची इच्छा असेल तेव्हा, तेथे ते बजावले जाण्यासाठी सर्वसामान्यापणे न्यायालय, असे समन्स पाठवण्यात आलेली व्यक्ती ज्याच्या स्थानिक अधिकारितेत असेल किंवा राहत असेल त्या दंडाधिकाऱ्याकडे ते समन्स प्रतिलिपीसहित पाठवील.