भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६८ :
शासकीय कर्मचाऱ्यांवर समन्स बजावणी :
१) समन्स पाठवलेली व्यक्ती ही शासनाच्या सक्रिय सेवेत असेल तेव्हा, समन्स काढणारे न्यायालय सर्वसामान्यपणे त्या समन्सच्या प्रतिलिप्या अशी व्यक्ती ज्या कार्यालयात नोकरीला असेल त्याच्या प्रमुखाकडे पाठवील, आणि असा प्रमुख तदनंतर कलम ६४ व्दारे उपबंधित केलेल्या रीतीने समन्स बजावण्याची तजवीज करील, आणि त्या कलमाव्दारे आवश्यक असलेल्या पृष्ठांकनासह ते आपल्या स्वाक्षरीनिशी न्यायालयाकडे परत पाठवील.
२) अशी स्वाक्षरी हा रीतसर बजावणीचा पुरावा असेल.
