भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ६ :
उपस्थित राहण्यास भाग पाडण्यासाठी आदेशिका :
(a) क) (अ) – समन्स :
कलम ६३ :
समन्साचा नमुना :
या संहितेखाली न्यायालयाने काढलेले प्रत्येक समन्स हे,-
एक) लेखी व दोन प्रतिलिप्यांमध्ये असेल व अशा न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्याने किंवा उच्च न्यायालय नियमाव्दारे वेळोवेळी निदेशित करील अशा अन्य अधिकाऱ्याने स्वाक्षरित केलेले असेल, आणि त्यावर न्यायालयाची मोहोर लावलेली असेल; किंवा
दोन) गूढलिखित (एनक्रिप्टेड) किंवा इलैक्ट्रॉनिक संपेषणाच्या इतर स्वरुपात आणि ज्यावर न्यायालयाचा शिक्का लावलेला असेल किंवा डिजिटल हस्ताक्षर असेल.