भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६१ :
निसटलेल्या इसमाचा पाठलाग करणे आणि पुन्हा अटक करण्याची शक्ती :
१) जर कायदेशीर हवालतीत असलेली व्यक्ती निसटली किंवा तिला अवैधपणे सोडवले गेले तर, ज्या व्यक्तीच्या हवालतीतून ती निसटली असेल किंवा तिला अवैधपणे सोडवले गेले असेल ती व्यक्ती तत्काळ तिचा पाठलाग करू शकेल व तिला भारतातील कोणत्याही स्थळी अटक करू शकेल.
२) पोटकलम (१) खालील अटाकांना, जरी अशी कोणतीही अटक करणारी व्यक्ती वॉरंटाअन्वये कार्य करत नसली व ती अटक करण्याचा प्राधिकार असलेला पोलीस अधिकारी नसली तरी, कलम ४४ चे उपबंध लागू असतील.