भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२४ :
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कार्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार :
एखाद्या राज्याच्या विधानसभेने ठरावाद्वारे तशी परवानगी दिल्यास, राज्यशासन उच्च न्यायालयाशी विचारविनियम करून अधिसूचनेद्वारे असे निदेशित करू शकेल की, कलम १२७, कलम १२८, कलम १२९, कलम १६४ आणि कलम १६६ यांमधील कार्यकारी दंडाधिकऱ्यासंबंधीचे निर्देश म्हणजे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यासंबंधीचे निर्देश होत असा त्याचां अर्थ लावण्यात यावा.