Bnss कलम ५२३ : उच्च न्यायालयाचा नियम करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२३ :
उच्च न्यायालयाचा नियम करण्याचा अधिकार :
१) राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने प्रत्येक उच्च न्यायालयाला पुढील गोष्टीबाबत नियम करता येतील, ते असे-
(a) क) (अ) आपणांस दुय्यम असलेल्या फौजदारी न्यायालयांमध्ये कोणत्या व्यक्तींना अर्जनवीस म्हणून काम करण्यास परवानगी देता येईल याबाबतचे नियम;
(b) ख) (ब) अशा व्यक्तींना लायसन देणे, त्यांनी धंदा चालवणे व त्यांनी आकारावयाच्या फीचे प्रमाण यांचे विनियमन करणारे नियम;
(c) ग) (क) याप्रमाणे केलेल्यांपैकी कोणत्याही नियमाचे व्यतिक्रमण करण्याबद्दल शिक्षेचा उपबंध करणारे व कोणत्या प्रधिकरणाने अशा व्यतिक्रमणाबाबत अन्वेषण करावयाचे व शिक्षा द्यावयाच्या ते ठरवणारे नियम;
(d) घ) (ड) राज्य सरकारने बनवलेल्या नियमांद्वारे विहित करणे आवश्यक असेल किंवा विहित करता येईल अशा अन्य कोणत्याही बाबीविषयीचे नियम.
२) या कलमाखाली केलेले सर्व नियम शासकीय राजपत्रात प्रकाशित केले जातील.

Leave a Reply