Bnss कलम ५१९ : विवक्षित प्रकरणी मुदतमर्यादा वाढविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१९ :
विवक्षित प्रकरणी मुदतमर्यादा वाढविणे :
या प्रकरणाच्या पूर्वगामी उपबंधांत काहीही अंतर्भूत असले तरी, मुदतमर्यादा संपल्यानंतर एखाद्या अपराधाची दखल घ्यावयाची झाल्यास, विलंबाचे योग्य प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे किंवा न्यायहितार्थ तशी दखल घेणे जरूरीचे आहे असे जर प्रकरणाच्या तथ्यांवरून किंवा त्यातील परिस्थितीत कोणत्याही न्यायालयाचे समाधान झाले तर, त्याला त्या अपराधाची दखल घेता येईल.

Leave a Reply