भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१५ :
मुदत मर्यादेची सुरुवात :
१) अपराध्याच्या संबंधात मुदतमर्यादा-
(a) क) (अ) अपराध्याच्या दिनांकास;किंवा
(b) ख) (ब) अपराधामुळे बाधा पोचलेल्या व्यक्तिला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अपराध घडल्याचे ज्ञात नव्हते असे असेल तर; असा अपराध घडल्याचे ज्या दिवशी अशा व्यक्तीला प्रथमच आणि ज्या दिवशी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला प्रथमच ज्ञात होईल त्यापैकी अगोदरच्या दिवशी; किंवा
(c) ग) (क) अपराध कोणी केला हे ज्ञात नसेल तर, अपराधी कोण होता हे ज्या दिवशी,अपराधामुळे बाधा पोचलेल्या व्याक्तिला प्रथमच आणि ज्या दिवशी अपराधाबाबत अन्वेषण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला प्रथमच ज्ञात होईल त्यांपैकी अगोदरच्या दिवशी, सुरु होइ्र्र्रल.
२) उक्त कालावधीची गणना करताना. ज्या दिवसापासून अशा कालावधीची गणना करावयाचीतो वगळता येईल.