भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१४ :
मुदत मर्यादा उलटून गेल्यावर दखल घेण्यास आडकाठी :
१) या संहितेत अन्यत्र अन्यथा उपबंधित केलेले असेल तेवढे खेरीजकरून एरव्ही, कोणतेही न्यायालय मुदत मर्यादा संपल्यानंतर, पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रवर्गातील अपराधाची दखल घेणार नाही.
२) मुदतमर्यादा –
(a) क) (अ) अपराध द्रव्यदंडाच्याच शिक्षेला पात्र असल्यास, सहा महिने,
(b) ख) (ब) अपराध जास्तीत जास्त एक वर्ष इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास, एक वर्ष;
(c) ग) (क) अपराध एक वर्षाहून अधिक, पण जास्तीत जास्त तीन वर्षे इतक्या मुदतीच्या इतका असेल. कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास, तीन वर्षे.
३) या कलमाच्या प्रयोजनार्थ, ज्या अपराधांची संपरीक्षा एकत्रितपणे करता येईल त्यांच्या संबंधातील मुदतमर्यादा त्यांपैकी जो अपराध अधिक कडक शिक्षा किंवा जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यास पात्र असेल त्या अपराधाच्या संबंधात निश्चित करण्यात येईल.
स्पष्टीकरण :
मुदतीची कालावधीची गणना करण्याच्या उद्देशाने संबंधित तारीख ही कलम २२३ अंतर्गत तक्रार सादर करण्याची तारीख किंवा कलम १७३ अंतर्गत नोटीस नोंदवण्याची तारीख असेल.