Bnss कलम ५१० : दोषारोपांची मांडणी न करणे किंवा त्याचा अभाव किंवा चूक यांचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१० :
दोषारोपांची मांडणी न करणे किंवा त्याचा अभाव किंवा चूक यांचा परिणाम :
१) सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाचा कोणताही निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश हा, दोषारोपाची मांडणी केलेली नव्हती, एवढयाच कारणावरून अथवा दोषारोपात दोषारोपांच्या अपसंयोजनासुद्धा कोणतीही चूक होती किंवा त्यात काही गळले होते किंवा काही गैरनियम गोष्ट होती, एवढ्याच कारणावरून विधिबाह्य मानला जाणार नाही. मात्र अपिलाचे, कायमीकरणाचे किंवा पुनरीक्षणाचे जे न्यायालय असेल त्याच्या मते त्यामुळे न्याय खरोखरीच निष्फळ झाला असेल तर तो अपवाद समजावा.
२) अपिलाचे, कायमीकरणाचे किंवा पुनरीक्षणाचे जे न्यायालय असेल त्याच्या मते जर खरोखरीच न्याय निष्फळ झाला असेल तर, ते-
(a) क) (अ) दोषारोपाची मांडणी केलेली नसल्यास त्या बाबतीत, दोषारोपाची मांडणी केली जावी व दोषारोपाची मांडणी झाली की तेथून पुढे संपरीक्षा पुन्हा सुरू केली जावी असा आदेश देऊ शकेल;
(b) ख) (ब) दोषारोपात चूक, गाळणूक किंवा गैरनियम गोष्ट असल्यास त्या बाबतीत, त्याला योग्य वाटेल अशा कोणत्याही रीतीने दोषारोपाची मांडणी करण्यात आल्यावर त्यावरून नव्याने संपरीक्षा केली जावी असा निदेश देऊ शकेल.
परंतु शाबीत केलेल्या तथ्यांबाबत आरोपीविरूद्ध कोणताही विधिग्राह्य दोषारोप केला जाऊ शकत नाही अशी त्या प्रकरणाची तथ्ये आहेत असे न्यायालयाचे मत असेल तर, ते दोषसिद्धी रद्द ठरवील.

Leave a Reply