भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५० :
मारक हत्यारे जप्त करण्याचा अधिकार :
या संहितेखाली कोणताही अटक करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, अटक केल्यानंतर लगेच, अटक झालेल्या व्यक्तीच्या अंगावर जी कोणतीही मारक हत्यारे असतील ती तिच्याकडून अभिग्रहण करू शकेल आणि याप्रमाणे अभिग्रहण केलेली सर्व हत्यारे अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा व्यक्तीने अटक केलेल्या व्यक्तीला ज्या न्यायालयासमोर किंवा अधिकाऱ्यासमोर हजर करणे या संहितेखाली आवश्यक असेल त्याच्यकडे सुपूर्द करील.
