भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०५ :
नाशवंत मालमत्तेची विक्री करण्याचा अधिकार :
अशा मालमत्तेच्या कब्जास हक्कदार असलेली व्यक्ती अज्ञात किंवा अनुपस्थित असून मालमत्ता लवकर व निसर्गत: खराब होण्यासारखी असेल तर, अथवा ज्या दंडाधिकाऱ्याला तिच्या अभिग्रहणाचे वृत्त कळवण्यात आले त्याच्या मते, तिची विक्री मालकाला फायदेशीर ठरवण्यासारखी असेल किंवा अशा मालमत्तेचे मूल्य दहा हजार रूपयांहून कमी असेल तर, दंडाधिकारी कोणत्याही वेळी तिच्या विक्रीचा निदेश देऊ शकेल, आणि कलमे ५०३ आणि ५०४ यांचे उपबंध अशा विक्रीपासून निव्वळ उत्पन्नाला व्यवहार्य असेल तितपत जसेच्या तसे लागू होतील.