Bnss कलम ५०४ : जेव्हा सहा महिन्यांत कोणीही मागणीदार उपस्थित होत नाही तेव्हा प्रकिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०४ :
जेव्हा सहा महिन्यांत कोणीही मागणीदार उपस्थित होत नाही तेव्हा प्रकिया :
१) जर अशा कालावधीत कोणत्याही व्यक्तीने अशा मालमत्तेवर अपाला मागणीहक्क शाबीत केला नसेल व अशी मालमत्ता जिच्या कब्जात सापडली ती व्यक्ती आपणांस ती मालमत्ता वैद्य रीतीने प्राप्त झाली हे दाखवून देण्यास असमर्थ असेल तर, दंडाधिकारी आदेशाद्वारे असे निदेशित करू शकेल की, अशी मालमत्ता राज्य शासनाच्या स्वाधील राहील व राज्य शासन ती विकू शकेल व अशा विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग राज्य सरकार नियमांद्वारा विहित करण्यात येईल अशा रीतीने केला जावा.
२) अशा कोणत्याही आदेशावरील अपील दंडाधिकाऱ्याने केलेल्या दोषसिद्धीवर सर्वसामान्यपणे ज्या न्यायालयाकडे अपिले होऊ शकतात त्याच्याकडे होऊ शकेल.

Leave a Reply