Bnss कलम ५०३ : मालमत्ता जप्त केल्यावर पोलिसांना अवलंबिण्याची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०३ :
मालमत्ता जप्त केल्यावर पोलिसांना अवलंबिण्याची प्रक्रिया :
१) जेव्हा केव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मालमत्तेचे अभिग्रहण केल्याचे वृत्त या संहितेच्या उपबंधांखाली दंडाधिकाऱ्याला कळवण्यात आले असेल, व चौकशीत किंवा संपरीक्षेत अशी मालमत्ता फौजदारी न्यायालयासमोर आणली गेली नसेल तेव्हा, अशा मालमत्तेची विल्हेवाट करणे किंवा तिच्या कब्जास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे तिची सुपूर्दगी करणे याबाबत अथवा अशी व्यक्ती कोण याविषयी खातरजमा करता येत नसेल तर अशी मालमत्ता अभिरक्षेत ठेवणे व हजर करणे याबाबत दंडाधिकारी स्वत:ला योग्य वाटेल असा आदेश देऊ शकेल.
२) अशी हक्कदार असलेली व्यक्ती ज्ञात असल्यास, दंडाधिकारी स्वत:ला योग्य वाटतील अशा शर्तीवर (काही असल्यास) त्या व्यक्तीकडे मालमत्ता सुपूर्द करण्याचा आदेश देऊ शकेल व जर अशी व्यक्ती अज्ञात असेल तर, दंडाधिकारी ती मालमत्ता अडकवून ठेवू शकेल व अशा बाबतीत ज्या वस्तू मिळून अशी मालमत्ता बनली असेल त्या विनिर्दिष्ट करणारी उद्घोषणा काढील व मालमत्तेवर मागणीहक्क सांगणाऱ्या व्यक्तीने अशा उद्घोषणेच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत आपणासमोर उपस्थित होऊन स्वत:चा मागणीहक्क शाबती करावा असे त्या उद्घोषणेद्वारे फर्मावील.

Leave a Reply