Bnss कलम ५०२ : स्थावर मालमत्तेचा कब्जा परत देववण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०२ :
स्थावर मालमत्तेचा कब्जा परत देववण्याचा अधिकार :
१) जेव्हा फौजदारीपात्र बलप्रयोग किंवा बलप्रदर्शन अथवा फौजदारीपात्र धाकदपटशा यांचा अवलंब करून केलेल्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवलेले असेल आणि अशा बलप्रयोगाने किंवा बलप्रदर्शनाने अथवा धाकदपटशाने कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्थावर मालमत्तेचा कब्जा काढून घेतला गेला आहे असे न्यायालयाला दिसून आले तर, न्यायालयाला योग्य वाटल्यास मालमत्ता जिच्या कब्जात असेल अशा अन्य कोणत्याही व्यक्तीला जरूर तर बळाने निष्कासित करून पाहिल्या व्यक्तीकडे त्या मालमत्तेचा कब्जा परत द्यावा असा आदेश देऊ शकेल :
परंतु, न्यायालय असा कोणताही आदेश दोषसिद्धीच्या दिनांकापासून एक महिन्याहून अधिक काळानंतर काढणार नाही.
२) त्या अपराधाची संपरीक्षा करणाऱ्या न्यायालयाने पोटकलम (१) खाली आदेश दिलेला नसेल त्या बाबतीत, अपिलाचे, कायमीकरणाचे किंवा पुनरीक्षणाचे. न्यायालय अपिलाचा, निर्देशनाचा किंवा, प्रकरणपरत्वे, पुनरीक्षणाचा निकाल करताना स्वत:ला योग्य वाटले तर, असा आदेश देऊ शकेल.
३) पोटकलम (१) खाली आदेश देण्यात आलेला असेल त्या बाबतीत, कलम ५०० चे उपबंध कलम ४९९ खालील आदेशाच्या संबंधात जेस लागू होतात तसे ते या आदेशाच्या संबंधात लागू असतील.
४) या कलमाखाली दिलेला कोणताही आदेश, कोणत्याही व्यक्तीला अशा स्थावर मालमत्तेवरील किंवा तिच्यातील जो कोणताही हक्क किंवा हितसंबंध दिवाणी दाव्यात प्रस्थापित करता येईल त्यास बाध आणणार नाही.

Leave a Reply