भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०१ :
बदनामीकारक आणि अन्य साहित्य नष्ट करणे :
१) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २९४, कलम २९५ किंवा कलम ३५६ च्या पोटकलम (३) आणि पोटकल (४) खाली दोषसिद्धी केल्यावर न्यायालय, ज्याच्याबाबत दोषसिद्धी झाली त्या वस्तूच्या नकला राहिल्या असतील त्या सर्व नकला नष्ट करण्याचा आदेश देऊ शकेल.
२) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २७४, कलम २७५, कलम २७६ किंवा कलम २७७ खाली दोषसिद्धी केल्यावर, न्यायालय त्याच रीतीने, ज्याच्याबाबत दोषसिद्धी झाली तो अन्नपदार्थ, पेय, औषधीद्रव्य किंवा वैद्यकीय सिद्धपदार्थ नष्ट करण्याचा आदेश देऊ शकेल.