भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०० :
कलम ४९८ किंवा कलम ४९९ खालील आदेशांविरूद्ध अपील :
१) कलम ४९८ किंवा कलम ४९९ खाली एखाद्या न्यायालयाने किंवा दंडाधिकाऱ्याने दिलेल्या आदेशामुळे नाराज झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा पूर्वोक्त न्यायालयाने केलेल्या दोषसिद्धींवर सर्वसामान्यपणे ज्या न्यायालयाकडे अपिल होऊ शकतात त्याच्याकडे त्या आदेशाविरूद्ध अपील करता येईल.
२) असे अपील करण्यात आल्यास अपीलन्यायालय अपिलाचा निकाल होईपर्यंत आदेश स्थगित करण्याचा निदेश देऊ शकेल किंवा आदेशात आपरिवर्तन अगर फरबदल करू शकेल किंवा आदेश शून्य करून न्याय्य असतील असे आणखी आदेश देऊ शकेल.
३) पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेले अधिकार अपिलाच्या, कायमीकरणाच्या किंवा पुनरीक्षाणाच्या नायालयालाही पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेला आदेश ज्या खटल्यात दिलेला होता त्याचे काम पाहताना वापरता येतील.