भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९९ :
आरोपीकडे सापडलेला पैसा निर्दोष खरेदी दाखला देणे :
चोरी करणे किंवा चोरीची मालमत्ता स्वीकारणे हे ज्या अपराधात समाविष्य आहे किंवा जो अपराध त्या सदरात मोडतो अशा कोणत्याही अपराधाबद्दल जेव्हा एखाद्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवण्यात आले असेल व ती चोरीची मालमत्ता असल्याचे माहीत नसताना किंवा तसे समजण्यास कारण नसताना तिच्याकडून अन्य कोणत्याही व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेतली असून, सिद्धदोष व्यक्तीच्या अटकेनंतर काही पैसा तिच्या कब्जातून घेण्यात आला आहे असे शाबीत करण्यात आले असेल तेव्हा, अशा खरेदीदाराचा अर्ज आल्यास व चोरीच्या मालमत्तेच्या कब्जास हक्कदार असलेल्या व्यक्तीला ती परत मिळाल्यावर, न्यायालय अशा खरेदीदाराने दिलेल्या किमतीहून अधिक नाही इतकी रक्कम अशा पैशातून त्याला देण्यात यावी असा आदेश सहा महिन्यांच्या कालावधीत देऊ शकेल.