भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९३ :
जामीनदार दिवाळखोर झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास तेव्हा किंवा बंधपत्र दंडपात्र होते, प्रक्रिया :
जेव्हा या संहितेखालील जामीनपत्राचा कोणताही जामीनदार दिवाळखोर होईल किंवा मृत्यू पावेल किंवा जेव्हा कलम ४९१ च्या उपबंधाखाली कोणतेही बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हा, ज्याच्या आदेशावरून असे बंधपत्र घेतले गेले होते ते न्यायालय किंवा तो प्रथमवर्ग दंडाधिकारी जिच्याकडून असा जामीन मागवण्यात आला होता त्या व्यक्तीला मूळ आदेशातील निदेशांनुसार नवीन जामीन देण्याचा आदेश देऊ शकेल व जर असा जामीन देण्यात आला नाही तर, जणू काही अशश मूळ आदेशाच्या अनुपालनात कसूर झालेली असावी त्याप्रमाणे अशा न्यायालयाला किंवा दंडाधिकाऱ्याला कार्यवाही करता येईल.