भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९२ :
बंधपत्र अगर जामीन बंधपत्र रद्द होणे :
कलम ४९१ च्या उपबंधांना बाध न येता, जेव्हा एखाद्या प्रकरणी या संहितेखालील बंधपत्र किंवा जामीनपत्र हे एखाद्या व्यक्तीने न्यायालयासमोर उपस्थित होण्याबाबत असेल आणि शर्तीचा भंग केल्याबद्दल ते दंडपात्र झाले असेल तर,-
(a) क) (अ) अशा व्यक्तीने निष्पादित केलेले बंधपत्र व त्याचप्रमाणे अशा प्रकरणात त्याच्या एका किंवा त्याहून अधिक जामीनदारांनी निष्पादित केले असल्यास ते बंधपत्र रद्द होईल; आणि
(b) ख) (ब) ज्याच्यासामेर उपस्थित राहण्यसाठी बंधपत्र निष्पादित केलेले असेल तो पोलीस अधिकारी किंवा, प्रकरणपरत्वे, ते न्यायालय यांची, असे बंधपत्र ज्या व्यक्तीवर बंधनकारक आहे त्या व्यक्तीने बंधपत्रातील शर्तीचे अनुपालन करण्यामध्ये कसूर करण्याला पुरेसे कारण नव्हते याबाबत खात्र झाली तर, तिची सुटका केली जाणार नाही :
परंतु, या संहितेच्या इतर कोणत्याही उपबंधांच्या अधीनतेने, त्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याला किंवा प्रकरणपरत्वे, न्यायालयाला पुरेशी वाटेल त्याप्रमाणे तितक्या रकमेची नवीन आणि अशा एका किंवा अधिक जामीनदारांनी बंधपत्र करून दिल्यावर तिला सोडून देता येईल.